हा तर शिक्षकांवर दाखविलेला अविश्वास..
महा.राज्य प्राथ.शिक्षक संघाचा आँनलाईन व आँफलाईन अध्ययन -अध्यापन लिंक भरण्यावर राज्यभर बहिष्कार
राज्यातील सर्व जिल्हा,तालुका व म.न.पा., न.प. शिक्षक संघाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना, साप्ताहिक आँफलाईन /आँनलाईन अध्ययन-अध्यापन संकलन लिंक भरावी असा आदेश राज्य शासनाने दिला आहे.
सध्या लाँकडाऊन व कोरोनाचा मोठ्या प्रमाणात राज्यात संसर्ग असतानाही राज्यातील सर्व स्तरातील शिक्षक विद्यार्थ्यांना आँनलाईन व आँफलाईन अध्यापन करत आहेत. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेची जबाबदारीही शिक्षकांवर सोपविण्यात आली आहे. तसेच आपतकालीन व्यवस्थेतही सर्व कामे कोणतीही सुविधा नसताना शिक्षक करत आहेत. अशा काळात शिक्षकांवर अविश्वास दाखवणे चुकीचे आहे.
राज्यातील कोणतेही शिक्षक ही लिंक भरणार नाहीत. तरी राज्य शासनाने माहीतीची लिंक भरण्याचा आदेश मागे घ्यावा.लिंक भरावयास लावणे म्हणजे राज्यातील सर्व शिक्षकांवर अविश्वास दाखवणे, असे शिक्षकांचे मत आहे.
''शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षक लिंक भरण्याला विरोध करत असुन, लिंक भरण्यास सामुदायिक रित्या बहिष्कार घालत आहोत. तरी राज्यातील कोणत्याही शिक्षकांनी लिंक भरु नये'', असे आवाहन महा.राज्य.प्राथ.शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी केले आहे.
-------------------------------------------
शिक्षकांनी दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक
✒जनसंचार✍-https://jansanchar.page/7dTB0O.html
-------------------------------------------