शिक्षकांनी दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक
शिक्षकांनी दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक

 

‘शासन परिपत्रकाचा नीट अभ्यास करून त्यानुसार नोंद ठेवण्यात यावी. कोणतीही हयगय करू नये,’ अधिका-यांचे शिक्षकांना संदेश.


 शाळा प्रत्यक्ष सुरू होण्याबाबत अद्यापही अनिश्चितता असून ऑनलाइन वर्गाचाच पर्याय सध्या समोर आहे. शिक्षकांना त्यांच्या ऑनलाइन अध्यापनाचा आढावा सादर करणे शिक्षण विभागाने बंधनकारक केले आहे. मात्र, सध्या घरोघरी सर्वेक्षणात गुंतलेल्या शिक्षकांना ऑनलाइन वर्ग कधी घ्यावेत आणि अहवाल कसा द्यावा असा प्रश्न पडला आहे.


कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अद्याप शैक्षणिक वर्ष सुरू झाले असले तरी प्रत्यक्षात शाळा भरलेल्या नाहीत. ऑनलाइन माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू आहे. शिक्षक कोणते माध्यम वापरतात याचा आढावा शिक्षण विभाग घेत असून त्यासाठी शिक्षकांना दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व परिषदेच्या संकेतस्थळावर शिक्षकांनी ही माहिती भरायची आहे. ‘शासन परिपत्रकाचा नीट अभ्यास करून त्यानुसार नोंद ठेवण्यात यावी. कोणतीही हयगय करू नये,’ असे संदेश अधिका-यांनी शिक्षकांना पाठवले आहेत.


सध्या शिक्षकांना ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेची जबाबदारीही शिक्षकांवर सोपविण्यात आली आहे. त्याअंतर्गत सध्या बहुतांशी शिक्षक घरोघरी जाऊन दिवसभर सर्वेक्षण करण्यात गुंतले आहेत. त्यामुळे ऑनलाइन वर्ग कधी घ्यायचे आणि अहवाल कसे द्यायचे असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे. शिक्षक संघटनांनी विभागाच्या या निर्णयाला विरोध दर्शवला आहे.


------------------------------------------------




Popular posts
आज लातूर जिल्ह्यात 162 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 102 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
अतिवृष्टीमुळे पीकाच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करा -राज्यमंत्री संजय बनसोडे// मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारची सुप्रीम कोर्टाला विनंती// लातुर 285 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 104 नवीन बाधित
Image
'शिवसेना आमच्यासोबत येत नसेल, तर मी राष्ट्रवादीला आमंत्रण देतो'
Image
महाराष्ट्राला आणखी एक केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता ।। राज्यात सुधारित कृषी कायदा लागू करणार नाही, महाविकास आघाडीतील विसंवाद पुन्हा उघड ।। रामदास आठवलेंचा आमदार-खासदार तरी आहे का ।। आज लातूर जिल्ह्यात 217 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 206 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
राज्यात करोनाग्रस्तांच्या मृत्यू चे प्रमाण वाढले, आज ३३९ मृत्यु, लातूर जिल्हा १२६, तर उस्मानाबाद जिल्ह्यात १६१ पॉझिटिव्ह रुग्णांची भर
Image