घरातून अपहरण झालेल्या त्या बाळाचा अखेर मृतदेह सापडला ।। हाथरस पीडितेच्या शवविच्छेदन अहवालात बलात्काराचा उल्लेखच नाही! ।। आज लातूर जिल्ह्यात 239 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 123 पॉझिटिव्ह रुग्ण

घरातून अपहरण झालेल्या त्या बाळाचा अखेर मृतदेह सापडला 



सातारा : घरातून अपहरण झालेल्या दहा महिन्यांच्या बाळाचा मृतदेह सापडल्याने साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. घराजवळ असलेल्या विहिरीत चिमुकल्याचा मृतदेह सापडला. दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात जोडप्याने बालकाचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.


त्रिंबक दत्तात्रय भगत यांचा मुलगा ओमकारचे मंगळवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अपहरण झाले होते. समाजमाध्यमांवरही मदतीचे आवाहन केले जात होते. लोणंद पोलिसांसह स्थानिक ग्रामस्थ बाळाचा कसून शोध घेत होते. मात्र घरापासून काही अंतरावर असलेल्या विहिरीत आज बाळाचा मृतदेह सापडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.


नेमकं झालं काय ?


त्रिंबक दत्तात्रय भगत यांच्या दहा महिन्यांच्या मुलाचे मंगळवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अपहरण झाले. ते आपल्या कुटुंबासह सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात असलेल्या काळज गावात राहतात. चार मुलींच्या पाठीवर झालेला ओमकार हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता.



भगत कुटुंबीय शेतात कामासाठी गेल्याने घरात कोणीच नव्हते. या संधीचा फायदा घेत अज्ञात व्यक्ती घरात शिरली आणि घरात झोपलेल्या दहा महिन्यांच्या चिमुकल्या ओमकारचे अपहरण केले.


त्रिंबक भगत यांच्या मोठ्या मुलीने हा प्रकार पाहिला आणि आरडाओरडा केला. मात्र तोपर्यंत अपहरणकर्ता बाळाला घेऊन पसार झाला. अपहरणकर्त्याचे वय अंदाजे 22 ते 25 वर्षे असल्याची माहिती आहे. त्याने अंगात काळा शर्ट आणि जीन्स घातली होती, तर त्याच्यासोबत असणाऱ्या महिलेने गुलाबी ड्रेस घातला होता. ते दोघे दुचाकीवरुन पसार झाल्याचे स्थानिक ग्रामस्थांकडून बोलले जात आहे.


-------------------------------------------


हाथरस पीडितेच्या शवविच्छेदन अहवालात बलात्काराचा उल्लेखच नाही!



हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. यातील सर्वात आश्चर्यजनक गोष्ट ही की यात या पीडितेवर बलात्काराचा उल्लेख नाही. पीडितेने मृत्यूपूर्वी दिलेल्या जबानीपेक्षा हे फारच वेगळे आहे. याच जबानीच्या आधारावर संशयित आरोपींवर सामूहिक बलात्काराचा गुन्हादाखल करण्यात आला होता. या अहवालानुसार पीडितेच्या मृत्यूचे मुख्य कारण गळ्याचे हाड तुटणे  हे सांगण्यात आले आहे.


अलीगढचे जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालय, जिथे आधी पीडितेला दाखल करण्यात आले होते, त्यांच्या अहवालात पीडितेच्या शरीरावरील जखमांच्या खुणांचा उल्लेख केला गेला आहे तर हाथरसच्या पोलीस अधिक्षकांनी याबाबत बोलताना म्हटले आहे, ‘अलीगढच्या रुग्णालयाच्या वैद्यकीय अहवालात जखमांचा उल्लेख आहे, पण त्यात जबरदस्तीने शारीरिक संबंधांची पुष्टी केलेली नाही. आत्तापर्यंत डॉक्टरांचे असे म्हणणे आहे की ते बलात्काराला दुजोरा देत नाहीत, याबद्दल ते तेव्हाच सांगू शकतील जेव्हा त्यांना एफएसएल रिपोर्ट मिळेल.’


सफदरजंग रुग्णालयाद्वारे देण्यात आलेल्या अहवालात म्हटले गेले आहे की पीडितेच्या गळ्यावर जखमांच्या खुणा आहेत आणि सोबतच गळा दाबल्याचेही दिसून आले आहे. पीडितेच्या मृत्यूचे मुख्य कारण व्हिसेरा अहवाल आल्यानंतरच कळेल. १४ सप्टेंबर रोजी या घटनेनंतर पीडितेला अलीगढच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, पण तिची परिस्थिती आणखी बिघडली तेव्हा २८ तारखेला तिला सफदरजंग रुग्णालयात हलवण्यात आले. २९ तारखेला सकाळी तिचा मृत्यू झाला.



शवविच्छेदन अहवालात काय म्हटलं?
- बलात्काराचा उल्लेख नाही
- पीडितेच्या मणक्याला दुखापत
- तरुणीच्या मानेलाही दुखापत
- पीडितेला हार्ट अटॅक आला होता होता
- पीडितेला ब्लड इन्फेक्शन झालं होतं
- 29 सप्टेंबर सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी मृत्यू


-------------------------------------------


कोरोना अपडेट 


महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या 15 लाखांजवळ.


दिवसभरात 16 हजार 476 नवीन रुग्णांचे निदान.


आज 394 मृत्यूंची नोंद.


लातूर जिल्हा :



आज प्राप्त झालेल्या 347 RTPCR अहवालांपैकी 234 अहवाल निगेटिव्ह आले असून 83 अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तसेच आज 721 Rapid Antigen Test पैकी 156 रुग्ण पॉझिटिव्ह तर 565 रुग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत. RTPCR आणि Rapid Antigen Test दोन्ही मिळून 239 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्ह्यात आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या एकूण बाधितांची संख्या 17300  झाली आहे, तर 14048 रुग्ण रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत आणि 1591 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. 1165 पॉझिटिव्ह रुग्ण स्वतःच्या घरी विलगीकरणात आहेत. जिल्ह्यातील एकूण मृतांचा आकड़ा 496 वर पोहोचला आहे.

 

--------------------------------------------


--------------------------------------------


उस्मानाबाद जिल्हा :


आज प्राप्त झालेल्या 185 RTPCR अहवालांपैकी 14 अहवाल पॉझिटिव्ह आले असून 147 अहवाल निगेटिव्ह आढळून आले आहेत.14 अहवाल इनकन्क्लूजीव आढळून आले आहेत. तसेच आज 527 Rapid Antigen Test पैकी 109 रुग्ण पॉझिटिव्ह तर 418 रुग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत. RTPCR आणि Rapid Antigen Test दोन्ही मिळून 123 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या एकूण बाधितांची संख्या 12305 झाली आहे तर 9533 रुग्ण रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत आणि 2392 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. जिल्ह्यातील एकूण मृतांचा आकड़ा 380 वर पोहोचला आहे.


--------------------------------------------






Popular posts
मराठा समाजाला आंदोलनाची वेळ ठाकरे सरकारने येऊ द्यायला नको होती// उस्मानाबाद शहरातील एका नामांकित खाजगी रुग्णालयाकडून रुग्णांची लूट //महाराष्ट्रात ३४ हजार ३४५ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू//लातुर 294 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 178 नवीन बाधित
Image
शिक्षकांनी दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक
Image
जिल्हाधिकाऱ्यांकडून अध्यादेशात बदल..
Image
काही लोकांना वाटतं मंदिर बांधून कोरोना जाईल - शरद पवार यांची टिका
Image