कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अद्याप शैक्षणिक वर्ष सुरू झाले असले तरी प्रत्यक्षात शाळा भरलेल्या नाहीत. ऑनलाइन माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू आहे. शिक्षक कोणते माध्यम वापरतात याचा आढावा शिक्षण विभाग घेत असून त्यासाठी शिक्षकांना दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व परिषदेच्या संकेतस्थळावर शिक्षकांनी ही माहिती भरायची आहे. ‘शासन परिपत्रकाचा नीट अभ्यास करून त्यानुसार नोंद ठेवण्यात यावी. कोणतीही हयगय करू नये,’ असे संदेश अधिका-यांनी शिक्षकांना पाठवले आहेत.
सध्या शिक्षकांना ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेची जबाबदारीही शिक्षकांवर सोपविण्यात आली आहे. त्याअंतर्गत सध्या बहुतांशी शिक्षक घरोघरी जाऊन दिवसभर सर्वेक्षण करण्यात गुंतले आहेत. त्यामुळे ऑनलाइन वर्ग कधी घ्यायचे आणि अहवाल कसे द्यायचे असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे. शिक्षक संघटनांनी विभागाच्या या निर्णयाला विरोध दर्शवला आहे.
------------------------------------------------