महाराष्ट्राला आणखी एक केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता ।। राज्यात सुधारित कृषी कायदा लागू करणार नाही, महाविकास आघाडीतील विसंवाद पुन्हा उघड ।। रामदास आठवलेंचा आमदार-खासदार तरी आहे का ।। आज लातूर जिल्ह्यात 217 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 206 पॉझिटिव्ह रुग्ण

महाराष्ट्राला आणखी एक केंद्रीय मंत्रिपद?


मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा जोरात



भारतीय जनता पक्षाच्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष मोदी सरकारच्या आगामी मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागले आहे. संघटनेत काम करणा-या नेत्यांची भूमिका स्पष्ट केल्यानंतर आता सरकारमध्ये नवे चेहरे समाविष्ट करण्याचा निर्णय घेणे सोपे झाले आहे.


पंतप्रधानांनी मे २०१४ मध्ये सरकार स्थापनेच्या अवघ्या सहा महिन्यांनतर ९ नोव्हेंबरला मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार केला होता. मात्र, शनिवारी भाजपाच्या ७० सदस्यीय कार्यकारिणीच्या घोषणेनंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा जोरात सुरु झाली आहे.


 मोठे चेहरे भाजपा संघटनेतून दूर गेली आहेत. त्यात राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे, राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. अनिल जैन, राष्ट्रीय सरचिटणीस सरोज पांडे, राम माधव, पी. मुरलीधर राव यांचा समावेश आहे. राज्यसभेचे सदस्य असलेल्या नेत्यांना आगामी मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विनय सहस्रबुद्धे, डॉ. अनिल जैन आणि सरोज पांडे हे राज्यसभेचे सदस्य आहेत. अशा परिस्थितीत पक्ष त्यांना मंत्रिपद देऊ शकतो. राम माधव आणि पी. मुरलीधर राव हे राज्यसभेचे सदस्य नाहीत अशा परिस्थितीत पक्षाला त्यांच्यासाठी राज्यसभेच्या जागेचीदेखील व्यवस्था करावी लागणार आहे.


विनय सहस्त्रबुद्धे यांना मंत्रिमंडळात स्थान दिले तर महाराष्ट्राच्या वाट्याला आणखी एक मंत्री येण्याची शक्यता आहे. सध्या नितीन गडकरी, रावसाहेब दानवे, प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल, संजय धोत्रे आणि रामदास आठवले हे मंत्री आहेत तर अरविंद सावंत यांनी राजीनामा दिला आहे.


-----------------------------------------------


राज्यात सुधारित कृषी कायदा लागू करणार नाही: अजित पवार


आधीच दिलेला आदेश रद्द करण्याची नामुष्की;


महाविकास आघाडी सरकार मधला विसंवाद पुन्हा उघड 



केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी विधेयकाला महाराष्ट्रात विरोध दर्शवला आहे. केंद्राच्या कायद्याची महाराष्ट्रात अंमलबजावणी होणार नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं. अशातच राष्ट्रवादीकडे असलेल्या पणन विभागाच्या सचिवांनी जारी केलेलं नोटिफिकेशन सध्या समोर येत आहे. या नोटिफिकेशनमध्ये कृषी कायद्याच्या तरतुदी सक्तीने लागू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


राज्याच्या पणन विभागाने ऑगस्ट महिन्यात कृषी विधेयका संदर्भातले तीन अध्यादेश लागू करण्याबाबत एक नोटिफिकेशन जारी केलं होतं. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या सचिवांकडून राज्य सरकारला पाठवण्यात आलेल्या पत्रानंतर याची अमंलबजावणी करण्यात आली होती.


मात्र असं असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यात कृषी विधेयक लागू होऊ देणार नाही असा पवित्रा घेतल्यामुळे महाविकास आघाडी सरकारमधील विसंवाद पुन्हा एकदा यानिमित्ताने चव्हाट्यावर आला आहे. इतकंच नाही तर काल काँग्रेसने या कृषी विधेयकाचा निषेध करण्यासाठी आंदोलन केले आणि राज्यपालांना याबाबत निवेदनही दिलं. मात्र 10 ऑगस्ट 2020 ला जारी करण्यात आलेल्या नोटिफिकेशन मध्ये राज्याच्या विधी व न्याय विभागाचा अभिप्राय घेऊन अध्यादेश लागू करण्यासंदर्भातील स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.



यामुळे प्रश्न उपस्थित होतो की राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या विधी व न्याय आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या पणन विभागाने लागू केलेल्या या निर्णयाची माहिती उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसला नव्हती का? तसं असेल तर देशात कृषी विधेयकाविरोधात पेटलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारमधल्या या विसंवादामुळे पुन्हा एकदा नामुष्की ओढवण्याची वेळ आली आहे.


-----------------------------------------


रामदास आठवलेंचा आमदार-खासदार तरी आहे का? 


‘केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना कोणीही गांभीर्याने घेत नाही. राज्यसभेतही नाही आणि बाहेरही नाही. त्यांचा एकही आमदार नाही, खासदार नाही’ असा टोला शरद पवारांनी लगावला. महाविकास आघाडी सरकार स्थिर असून, या सरकारला कोणताही धोका नाही. हे सरकार पाच वर्षे टिकेल, असा विश्वास शरद पवारांनी पंढरपुरात आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला.



आठवले म्हणाले होते - “संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस माझे चांगले मित्र आहेत. शिवसेनेने कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा काढून शिवसेना-भाजप-रिपाइंचं सरकार बनवावं. उद्धव ठाकरे एक वर्ष मुख्यमंत्री राहतील. उर्वरीत तीन वर्ष देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रिपद द्यावं. संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर कॉंग्रेस-राष्ट्रवादी अस्वस्थ आहे. जर शिवसेना आमच्यासोबत येत नसेल, तर मी राष्ट्रवादीला आमंत्रण देतो. त्यांनी महाराष्ट्र आणि देशाच्या हितासाठी भाजपसोबत एकत्र यावं आणि सरकार स्थापन करावं.” असा प्रस्ताव रामदास आठवले यांनी मांडला होता.


------------------------------------------


 कोरोना अपडेट 


लातूर जिल्हा :



आज प्राप्त झालेल्या 266 RTPCR अहवालांपैकी 214 अहवाल निगेटिव्ह आले असून 37 अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तसेच आज 789 Rapid Antigen Test पैकी 180 रुग्ण पॉझिटिव्ह तर 609 रुग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत. RTPCR आणि Rapid Antigen Test दोन्ही मिळून 217 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्ह्यात आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या एकूण बाधितांची संख्या 16806 झाली आहे, तर 13483 रुग्ण रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत आणि 1797 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. 1050 पॉझिटिव्ह रुग्ण स्वतःच्या घरी विलगीकरणात आहेत. जिल्ह्यातील एकूण मृतांचा आकड़ा 476 वर पोहोचला आहे.

 

--------------------------------------------


--------------------------------------------


उस्मानाबाद जिल्हा :


आज प्राप्त झालेल्या 170 RTPCR अहवालांपैकी 73 अहवाल पॉझिटिव्ह आले असून 87 अहवाल निगेटिव्ह आढळून आले आहेत. 10 अहवाल इनकन्क्लूजीव आढळून आले आहेत. तसेच आज 353 Rapid Antigen Test पैकी 133 रुग्ण पॉझिटिव्ह तर 220 रुग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत. RTPCR आणि Rapid Antigen Test दोन्ही मिळून 206 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या एकूण बाधितांची संख्या 11983 झाली आहे तर 9202 रुग्ण रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत आणि 2414 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. जिल्ह्यातील एकूण मृतांचा आकड़ा 367 वर पोहोचला आहे.


--------------------------------------------







Popular posts
मराठा समाजाला आंदोलनाची वेळ ठाकरे सरकारने येऊ द्यायला नको होती// उस्मानाबाद शहरातील एका नामांकित खाजगी रुग्णालयाकडून रुग्णांची लूट //महाराष्ट्रात ३४ हजार ३४५ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू//लातुर 294 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 178 नवीन बाधित
Image
घरातून अपहरण झालेल्या त्या बाळाचा अखेर मृतदेह सापडला ।। हाथरस पीडितेच्या शवविच्छेदन अहवालात बलात्काराचा उल्लेखच नाही! ।। आज लातूर जिल्ह्यात 239 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 123 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
शिक्षकांनी दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक
Image
जिल्हाधिकाऱ्यांकडून अध्यादेशात बदल..
Image
काही लोकांना वाटतं मंदिर बांधून कोरोना जाईल - शरद पवार यांची टिका
Image