'संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस माझे चांगले मित्र आहेत. शिवसेनेने कॉंग्रेस राष्ट्रवादीचा पाठिंबा काढून शिवसेना-भाजप-आरपीआयचे सरकार बनवावे. उद्धव ठाकरे एक वर्ष मुख्यमंत्री राहतील. उर्वरीत तीन वर्ष देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रिपद द्यावे. पण, जर शिवसेना आमच्यासोबत येत नसेल, तर मी राष्ट्रवादीला आमंत्रण देतो. त्यांनी महाराष्ट्र आणि देशाच्या हितासाठी भाजपसोबत एकत्र यावे आणि सरकार स्थापन करावे', असे आठवले म्हणाले.
'शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा काढून भाजपसोबत यावे आणि शिवसेना येत नसेल तर राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हितासाठी भाजपसोबत यावं, असे मत रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. अभिनेत्री पायल घोष कथित अत्याचार प्रकरणीही त्यांनी आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली.
शाळा प्रत्यक्ष सुरू होण्याबाबत अद्यापही अनिश्चितता असून ऑनलाइन वर्गाचाच पर्याय सध्या समोर आहे. शिक्षकांना त्यांच्या ऑनलाइन अध्यापनाचा आढावा सादर करणे शिक्षण विभागाने बंधनकारक केले आहे. मात्र, सध्या घरोघरी सर्वेक्षणात गुंतलेल्या शिक्षकांना ऑनलाइन वर्ग कधी घ्यावेत आणि अहवाल कसा द्यावा असा प्रश्न पडला आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अद्याप शैक्षणिक वर्ष सुरू झाले असले तरी प्रत्यक्षात शाळा भरलेल्या नाहीत. ऑनलाइन माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू आहे. शिक्षक कोणते माध्यम वापरतात याचा आढावा शिक्षण विभाग घेत असून त्यासाठी शिक्षकांना दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व परिषदेच्या संकेतस्थळावर शिक्षकांनी ही माहिती भरायची आहे. ‘शासन परिपत्रकाचा नीट अभ्यास करून त्यानुसार नोंद ठेवण्यात यावी. कोणतीही हयगय करू नये,’ असे संदेश अधिका-यांनी शिक्षकांना पाठवले आहेत.
सध्या शिक्षकांना ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेची जबाबदारीही शिक्षकांवर सोपविण्यात आली आहे. त्याअंतर्गत सध्या बहुतांशी शिक्षक घरोघरी जाऊन दिवसभर सर्वेक्षण करण्यात गुंतले आहेत. त्यामुळे ऑनलाइन वर्ग कधी घ्यायचे आणि अहवाल कसे द्यायचे असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे. शिक्षक संघटनांनी विभागाच्या या निर्णयाला विरोध दर्शवला आहे.
लातूर जिल्हा :
उस्मानाबाद जिल्हा :
आज प्राप्त झालेल्या 139 RTPCR अहवालांपैकी 49 अहवाल पॉझिटिव्ह आले असून 83 अहवाल निगेटिव्ह आढळून आले आहेत. 07 अहवाल इनकन्क्लूजीव आढळून आले आहेत. तसेच आज 220 Rapid Antigen Test पैकी 53 रुग्ण पॉझिटिव्ह तर 167 रुग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत. RTPCR आणि Rapid Antigen Test दोन्ही मिळून 102 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या एकूण बाधितांची संख्या 11766 झाली आहे तर 9139 रुग्ण रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत आणि 2239 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. जिल्ह्यातील एकूण मृतांचा आकड़ा 356 वर पोहोचला आहे.
--------------------------------------------