अयोध्येतल्या ऐतिहासिक राम मंदिराचं भूमीपूजन 5 ऑगस्टला होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे भूमीपूजन केलं जाणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी राम मंदिर भूमीपूजनाच्या मुद्द्यावर मोदी सरकारवर खोचक टीका केली आहे.
कोरोनामुळे देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आर्थिक नुकसान होत आहे. त्याकडे सरकारने लक्ष द्यायला हवे. मात्र काही लोकांना वाटतं मंदिर बांधून कोरोना जाईल, अशा शब्दांत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. शहर आणि जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांच्या राम मंदिराच्या भूमीपूजनाच्या प्रश्नाला उत्तर देतांना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली.